येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुका पोलीस स्टेशन मध्ये १९ ऑक्टोबर रोजी कुसुर येथील बापू गायकवाड यांनी आपल्या ताब्यातील ४० बकऱ्या चोरी गेल्याची तक्रार दिली होती. येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाची चक्री वेगाने फिरवत चोराला ४८ तासात गजाआड करुन २ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी तपास करतांना बापू गायकवाड यांच्याकडे कामावर असलेला संशयित उत्तम शिवाजी मोरे राहणार करंजी तालुका कोपरगांव याचे तांत्रिक विश्लेषण केले. सदरचा आरोपी हा सातारा जिल्हा येथील एका प्रसिद्ध शेळी बाजार बकऱ्या विक्रीसाठी गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी तात्काळ एक पथक नेमून सातारा येथे पाठवले. यावेळी संशयित आरोपी उत्तम शिवाजी मोरे याला चाळीस बकऱ्या सह रंगेहाथ पकडले.
येवला तालुका अवघ्या ४८ तासात आरोपीला मुद्देमाल सह अटक केल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस नाईक वैरगर, पोलीस शिपाई, आबा पिसाळ,सागर बनकर,गणेश सोनवणे,गौतम मोरे,नितीन पानसरे, आदींनी ही कामगिरी केली आहे.