इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पारनेरचे नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा विधानसभा अध्यक्षानी स्वीकारला आहे. त्यामुळे पारनेरची विधान सभेची जागा आता रिक्त झाली आहे. पण, विधानसभा निवडणुकीला कमी कालावधी राहिला असल्याने तेथे पोट निवडणूक होऊ शकणार नाही. त्यामुळे पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत पारनेरला आता आमदार नसणार आहे.
या निवडणुकीत निलेश लंके यांचा विजय झाला तर पारनेरचा खासदार होणार आहे. जर त्यांचा पराभव झाला तर आमदार व खासदार पारनेरचे नसेल. विशेष म्हणजे लंके यांनी कालावधी पूर्ण होण्याआधी राजीनामा दिल्याने त्यांना पेन्शनही मिळू शकणार नाही असे बोलले जात आहे.
लंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटात होते. पण, लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. पण, पक्ष बदलल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यामुळे अजित पवार गटाचा एक आमदार कमी झाला आहे.