इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उदयपूर येथून अटक केली आहे. भावेश भिंडेला आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणले जाणार आहे. भावेश भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूरमध्ये हॉटेल रूम बुक केली होती तिथे तो राहत होता. होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेपासून भावेश भिंडे हा फरार होता. पोलीस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अटक केली.
या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक कारचे नुकसान झाले. ६६ पेक्षा जास्त रुग्णांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा मालक भावेश भिंडेचा पोलीस शोध घेत होते. पण तो फरार होता. पण अखेर तो पोलिसांच्या हाती लागला आहे.
भावेशच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात पेट्रोल पंपच्या बाजूला १२०×१२० आकाराचं हे होर्डिंग उभारले होते. त्याची मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. दोन दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग जमिनीच्या दिशेला झुकलं आणि थेट बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर कोसळले.नया दुर्घटनेत जवळपास १२० पेक्षा जास्त नागरीक ढिगाऱ्याखाली दबले होते.