रविवार, सप्टेंबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सायबर गुन्हेगारांकडून ब्लॅकमेल आणि डिजिटल अ‍ॅरेस्ट…बघा केंद्र सरकाराने नेमकं काय सांगितले

by Gautam Sancheti
मे 16, 2024 | 11:34 pm
in संमिश्र वार्ता
0
crime11

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सायबर गुन्हेगारांकडून पोलिस अधिकारी, केंद्रीय अन्वेषण विभाग( सीबीआय), अंमली पदार्थ नियंत्रण विभाग(एनसीबी), भारतीय रिझर्व बँक (आरबीआय), सक्तवसुली संचालनालय आणि इतर कायदे अंमलबजावणी संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून ब्लॅकमेल, खंडणीखोरी आणि डिजिटल अ‍ॅरेस्टच्या तक्रारी राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. हे फसवणूक करणारे गुन्हेगार सामान्यतः संभाव्य पीडित व्यक्तीला फोन करतात आणि त्या व्यक्तीने अवैध वस्तू, अंमली पदार्थ, बनावट पारपत्र किंवा इतर कोणतीही प्रतिबंधित वस्तू असलेले पार्सल पाठवले आहे किंवा जाणीवपूर्वक अशी सामग्री मागवली असून ती प्राप्त केली असल्याचे सांगतात . काही वेळा ते असेही कळवतात की पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे किंवा त्यांचा अपघात झाला आहे आणि ते त्यांच्या ताब्यात आहेत. अशा प्रकारच्या तथाकथित गुन्ह्यांमध्ये तडजोड करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. काही घटनांमध्ये अजाण पीडितांना डिजिटल अ‍ॅरेस्टला सामोरे जावे लागते आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत या फसवणूक करणाऱ्यांसमोर स्काईप किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दृश्य स्वरुपात उपलब्ध रहावे लागते. हे फसवणूककर्ते पोलिस ठाणे आणि सरकारी कार्यालयांसारख्या दिसणाऱ्या स्टुडियोचा देखील वापर करतात आणि खरे अधिकारी भासवण्यासाठी गणवेशात देखील वावरतात.

देशभरात अनेक पीडीत व्यक्तींनी अशा फसवणूक करणाऱ्यांकडे मोठी रक्कम गमावली आहे. संघटित आर्थिक गुन्हेगारीचा हा प्रकार असून सीमेपलीकडील गुन्हेगारी टोळ्यांकडून ते सुरू असल्याचे समजले जाते.

गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) देशातील सायबर गुन्ह्यांचा सामना करण्याशी संबंधित उपक्रमांमध्ये समन्वय राखत असते. या घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी गृह मंत्रालय इतर मंत्रालये आणि त्यांच्या संस्था, आरबीआय आणि इतर संस्थांसोबत अतिशय बारकाईने काम करत आहे. 14C हे केंद्र राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांना अशी प्रकरणे ओळखण्यासाठी आणि त्यांच्या तपासासाठी आवश्यक माहिती आणि तांत्रिक पाठबळ पुरवत आहे.

अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या 1000 पेक्षा जास्त स्काईप आयडींना 14C ने मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने ब्लॉक केले आहे. हे केंद्र अशा फसवणूक कर्त्यांनी वापरलेली सिम कार्ड, मोबाईल उपकरणे आणि म्युल अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी देखील सुविधा देत आहे. इन्फोग्राफिक्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून I4Cने आपल्या ‘Cyberdost’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विविध प्रकारचे इशारा देखील जारी केले आहेत. उदा. एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर.

नागरिकांना दक्ष राहण्याचा आणि अशा प्रकारच्या फसवणुकीविरोधात जागरुकतेचा प्रसार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. असे कॉल आल्यास नागरिकांनी तातडीने या प्रकाराची तक्रार 1930 या सायबरक्राईम हेल्पलाईनवर किंवा www.cybercrime.gov.in यावर करावी.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र किनाऱ्याजवळ पाच जणांसह मासेमारी नौका ताब्यात…हे आहे कारण

Next Post

तीन जणांच्या टोळक्याने ४७ वर्षीय परप्रांतीयास केली बेदम मारहाण…द्वारका भागातील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणुकीच्या प्रकरणात सुनावली ४ वर्षांची शिक्षा…

सप्टेंबर 21, 2025
bullete train
महत्त्वाच्या बातम्या

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती

सप्टेंबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी…

सप्टेंबर 21, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

भारतीय शिष्टमंडळ या तारखेला अमेरिकेला भेट देणार…या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 21, 2025
G1Sin8kW4AAjERO e1758416853507
मुख्य बातमी

दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर…असा आहे प्रवास

सप्टेंबर 21, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणीची मंत्रालयातून गंभीर दखल, गुन्हा दाखल, तिघांना अटक

सप्टेंबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, २१ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 20, 2025
cricket
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये नोव्हेंबर मध्ये दोन रणजी सामन्यांचा थरार….हे सामनेही होणार

सप्टेंबर 20, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

तीन जणांच्या टोळक्याने ४७ वर्षीय परप्रांतीयास केली बेदम मारहाण…द्वारका भागातील घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011