इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी विश्वचषक २०२३ या स्पर्धेत आज झालेल्या २ वेगवेगळ्या सामन्यांमध्ये श्रीलंकेने नेदरलँडला तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून दोन गुणांची कमाई केली.
असा रंगला श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
२६२ या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँड समोर श्रीलंकेचा देखील ‘दक्षिण आफ्रिका’ होतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. श्रीलंकेचे ३ फलंदाज १०४ धावसंख्येवर तंबूत परतलेले होते. परंतु सादीरा समरविक्रमा (१०७ चेंडूत नाबाद ९१) हा मदतीला धावून आला आणि अखेरीस ४८.२ षटकात श्रीलंकेने ५ गड्यांच्या मोबदल्यात २६३ धावा करून हा सामना जिंकला.
लखनऊ येथे दिवसा खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलँड संघाने श्रीलंकेला अतिशय चांगली लढत दिली परंतु अनुभवाने थोडे सरस असलेल्या श्रीलंकेला हा सामना हा सामना १० चेंडू आणि ५ बळी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेला पराभूत करताना नेदरलँड ने मैदानावर शेवटपर्यंत तग धरला होता परंतु आज श्रीलंके विरुद्ध शक्य असताना देखील ते विजयापासून दूर राहिले
या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर नेदरलँड ने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. या संघाकडे तळाला सुद्धा चांगले फलंदाज आहेत याची ओळख नेदरलँड ने आज क्रिकेट विश्वाला करून दिली. ६ बाद ९१ या धावसंख्येनंतर हा संघ फार तर १५० धावांपर्यन्त मजल मारणार अशी शक्यता वाटत असताना एसए एंजेलब्रिश्ट (७०) आणि एसए व्हॅन बीक (५९) या दोघांनी ७ व्या विकेटसाठी १३० भावांची विक्रमी भागीदारी रचली. या सामन्यात श्रीलंकेतर्फे दिलशान मधुशानका आणि कसून रजिथा या दोघांनी प्रत्येकी ४ बळी घेतले. आजच्या या विजयानंतर श्रीलंकेला यंदाच्या विश्वचषकात प्रथमच दोन गुण मिळाले आहेत.
असा झाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लडचा सामना
मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या दोन बलाढ्य संघांमधला सामना अतिशय कंटाळवाणा आणि पूर्णपणे एकतर्फी झाल्याने, दर्दी मुंबईकर क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. या स्पर्धेच्या अगदी सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४२८ धावांचा डोंगर श्रीलंकेपुढे उभारला होता. आज इंग्लंड विरुद्ध देखील अशीच दमदार कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हेनरीच क्लासेन (१०९) मार्को जानसेन (७५ नाबाद) रिझा हेनड्रिक्स(८५) आणि रॕसी वॕन दर डुसेन (६०) आणि कर्णधार एडन मॅक्रम (४२) यांनी एकापेक्षा एक सरस कामगिरी केल्यामुळे जिंकण्यासाठी इंग्लंडला ४०० धावांचे भलेमोठे आव्हान मिळाले. हे आव्हान पेलवण्यासारखे नव्हतेच . या सामन्यात इंग्लंडचा डाव अवघ्या २२ षटकात १७० धावसंख्येवर आटोपला आणि त्यामुळे गतविजेत्या इंग्लंडचा या स्पर्धेत आणखी एक मोठा पराभव (२२९ धावा) बघायला मिळाला.
उद्या भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये धरमशाला येथे लढत होईल