नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे, तरुण आणि नव मतदार यांच्यात मतदाना करण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी स्वीप समितीच्या माध्यमातून शुभंकर म्हणुन ‘वोटोबा’ हा नाशिक शहरात मतदार जनजागृती करतोय, नाशिककर देखील या वोटोबासोबत सेल्फी घेऊन मतदान करण्याचा निर्धार करताय. नाशिक शहरात विविध ठिकाणी जाऊन हा वोटोबा मतदार जनजागृती करत असून नागरिकांमध्ये वोटोबा कडून होणारी जनजागृती हा कुतूहलाचा विषय ठरतोय.