मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

by India Darpan
मे 16, 2024 | 6:51 pm
in संमिश्र वार्ता
0
election 1


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन मतदारांनी आपली मतदार चिठ्ठी डाऊनलोड करुन आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

मतदारांना त्यांच्या मतदान क्रमांक, मतदान केंद्र, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक याची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन अँप आणि https://voters.eci.gov.in/ व https://electoralsearch.eci.gov.in/ या दोन वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना आपल्या मतदार यादीतील नाव व इतर माहिती घेता येईल तसेच मतदार चिठ्ठी सुद्धा डाऊनलोड करता येईल. या मतदार चिठ्ठीची प्रिंट आऊट घेऊन मतदानासाठी जाता येणार आहे. या मतदार चिठ्ठीसोबत भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेली १२ पैकी एक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App -VHA) – या ॲपलिकेशन द्वारे नागरिकांना मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.

खालील पायऱ्या फॉलो करून व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲपद्वारे व्होटर स्लिप डाउनलोड करू शकता :

पायरी 1: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’ डाउनलोड करावे.

पायरी 2: मतदार सेवा पोर्टल (https://voters.eci.gov.in/ ) या संकेतस्थळावर नोंदणी केली असल्यास तेथे नोंदणीकृत तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा किंवा तुम्ही मतदार सेवा वेबसाइटवर नोंदणीकृत नसाल तर ‘नवीन वापरकर्ता’ म्हणून नोंदणी करा आणि ॲपमध्ये लॉग इन करा.

पायरी 3: ‘मतदार यादीत आपले नाव शोधा’ या पर्यायावर क्लिक करा.

पायरी 4: पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘मोबाइलद्वारे शोधा’, ‘बार/क्यूआर कोडद्वारे शोधा’, ‘तपशीलांनुसार शोधा’ किंवा ‘EPIC क्रमांकाद्वारे शोधा’.

पायरी 5: आवश्यक माहिती समाविष्ट करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 6: मतदारांचे तपशील दिसेल. त्या ठिकाणच्या ‘डाउनलोड’ आयकॉनवर क्लिक करा.

वेबपोर्टलवरून ऑनलाईन मतदार चिठ्ठी (व्होटर स्लिप) अशी करा डाउनलोड

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनही आपल्याला मतदार चिठ्ठी डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी खालील प्रमाणे स्टेप फॉलो करा.

पायरी 1: भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://voters.eci.gov.in/ व https://electoralsearch.eci.gov.in/ वेबसाइटवर लॉग इन करा.

पायरी 2: मुख्यपृष्ठावरील ‘मतदार यादीत शोधा’ (Search in Electoral Roll) टॅबवर क्लिक करा.

पायरी 3: सोबतच्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा – ‘तपशीलांनुसार शोधा’, ‘EPIC द्वारे शोधा’ किंवा ‘मोबाईलद्वारे शोधा’.

पायरी 4: आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड टाका करा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

पायरी 5: समोर तुमचे मतदार विवरण दिसेल. तुम्ही तुमचे तपशील बरोबर आहेत का ते तपासू शकता.

पायरी 6: मतदार तपशीलाच्या खालील बाजूस ‘मतदार माहिती छापा’ (प्रिंट व्होटर इन्फॉर्मेशन) बटणावर क्लिक करा.

डाऊनलोड झालेली मतदार माहितीची प्रिंट काढून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांची नावे ऑनलाइन मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिले आहेत. या दोन्ही माध्यमातून तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र तपशील सहजपणे पाहू शकता. यामध्ये नाव, पत्ता, लोकसभा मतदारसंघाचे नाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीमधील भाग क्रमांक व नाव आणि भाग मतदाता क्रमांक याची माहिती नमूद असते. प्रत्येकाला ऑनलाईन माध्यमातून ही मतदार स्लिप डाउनलोड करता येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत….

Next Post

या लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल…

Next Post
fir111

या लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल…

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011