इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दहा दिवसांपूर्वीच कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहे. पण, यामागे जागतिक बाजारपेठेत झालेली घसरण व पाकिस्तान परदेशात कांदा स्वस्तात विकत असल्याचे बोलले जात आहे. भारतीय कांदा पाकिस्तानी कांद्यापेक्षा महाग असल्याने निर्यातीची मागणी कमी झाली आहे.
निर्यातबंदीच्या काळातही विदेशी खरेदीदारांनी पाकिस्तानी कांद्याचा साठा केला होता, त्यामुळे मागणीही कमी होत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी कांदाही परदेशी खरेदीदारांसाठी स्वस्त होत आहे. अशा परिस्थितीत विदेशी खरेदीदार स्टॉक संपण्याची वाट पाहत आहेत.
केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. महाराष्ट्रासह अनेक भागात शेतकऱ्यांनी त्याला जोरदार विरोध केला. खर्चही निघत नसल्याने सरकारविरोधात शेतक-यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन आंदोलन केले. त्यानंतर दहा दिवसापूर्वी ही निर्यादबंदी उठवली आहे. पण, त्यातही अट टाकल्यामुळे त्यातूनही शेतक-यांचे नुकसान झाले आहे.
निर्यातबंदी होईपर्यंत कांद्याचे दर स्थिर होते. मात्र बंदी उठल्यानंतर पुरवठा वाढल्याने आठवडाभरात जागतिक बाजारात कांद्याचे भाव ५० टक्क्यांहून अधिक घसरले. निर्यातीत घट झाल्यामुळे भारतातील कांद्याचे भावही गेल्या आठवड्यात १५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत,