चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एखादा गुन्हा केला तर तो लपून राहत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक प्रकरण असे उघड झाले. पण, या उघड होण्यामागे प्रेम विवाहाला नकार दिल्याचे कारण ठरले. मूल तालुक्यातील उथळपेठ येथील एका मुलाचे आणि मुलीचे प्रेमसंबंध होते. मुलाच्या वडिलांनी रितसर मुलीच्या वडिलांकडे जाऊन लग्नाची मागणी घातली; मात्र मुलीच्या वडिलांनी या लग्नासाठी नकार दिला. तेवढ्यावरच न थांबता मुलीला त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांत केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मुलाच्या वडिलांनी सहा महिन्यापूर्वीचा मुलीच्या वडिलांचे शिकारीचे प्रकरण उघडकीस आणले…
या शिकारीची घडलेली घटना अशी समोर आली. सुरेश चिचघरे यांनी आपल्या गावाजवळील शेतात मका पिकाची लागवड केली होती. मका पिकांच्या संरक्षणासाठी त्यांनी ताराच्या कुंपण घालून त्यात विजेचा प्रवाह सोडला होता. विजेचा धक्का लागून त्यात एका वाघाचा मृत्यू झाला. वाघ मेल्यानंतर कारवाईच्या भीतीपोटी त्याने इतर सहकार्याच्या मदतीने हे प्रकरण दाबले. त्यांनी मृत वाघाचा मृतदेह शेतात खड्डा खणून पुरून टाकला.
कुणकुण प्रियकरला लागली.
मात्र कालांतराने या प्रकरणाची कुणकुण या प्रकरणातील प्रियकर तरुणाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागली. त्यानंतर त्यांनी आपला बदला घेण्याचे निश्चित केले. व हे प्रकरण उघड केले. त्यानंतर वनविभागाने संशयित आरोपी सुरेश चिचघरे आणि त्याचा साथीदार श्रीकांत बुरांडे याला अटक केली आहे.