नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभर लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहूनही प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयितास पोलीसांनी अटक केली आहे.
अल्तमश जिलानी शहा (२० रा. सादिकनगर,वडाळागाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताचे पीडितेशी प्रेमसंबध होते. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने गेल्या २३ एप्रिल रोजी मुलीस घरातून पळवून नेले होते.
द्वारका परिसरातील बागवानपुरा भागात दोघे भाडेतत्वावर लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी (दि.१३) मुलीचे आई वडिल व काका तिला भेटण्यासाठी गेले असता संशयिताने लग्नास नकार दिला. अधिक तपास उपनिरीक्षक घुगे करीत आहेत.