नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामसेवक मनोज घोडके व शिपाई सचिन भोलाणकर हे सहा हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे आईच्या नावाचे घर व प्लॉट असून त्यांना सदर घर व प्लॉट वर आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामपंचायत राजुरा येथे अर्ज केला होता. त्याप्रमाणे तक्रारदार यांचे फेरफार वर नाव लावण्यासाठी
११ हजार रुपये लाचेची मागणी ग्रामसेवक यांनी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.15/05/2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष दि.15/05/2024 रोजी पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचा समक्ष ११ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानंतर ग्रामसेवक घोडके यांचे सांगणे वरून शिपाई भोलाणकर यांनी राजुरा ग्रामपंचायत येथे सहा हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-42 रा. राजुरा ता. मुक्ताईनगर जि.जळगांव
आलोसे- क्रं 1. मनोज सुर्यकांत घोडके , वय 34 वर्ष व्यवसाय नोकरी , ग्रामसेवक राजुरा ता. मुक्ताईनगर जि.जळगांव , वर्ग 3
आलोसे क्र. 2. सचिन अशोक भोलाणकर, वय 23 वर्ष व्यवसाय ग्रामपंचायत शिपाई, राजुरा ता .
मुक्ताईनगर जि. जळगांव वर्ग 4
*लाचेची मागणी- 11,000/-
*लाच स्विकारली- 6000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 6000/-रुपये
*लालेची मागणी – दि.15/05/2024
*लाच स्विकारली – दि.15/05/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे आईच्या नावाचे घर व प्लॉट असून त्यांना सदर घर व प्लॉट वर आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामपंचायत राजुरा येथे अर्ज केला होता. त्याप्रमाणे तक्रारदार यांचे फेरफार वर नाव लावण्यासाठी
11000/- रुपये लाचेची मागणी आलोसे ग्रामसेवक यांनी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.15/05/2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष दि.15/05/2024 रोजी पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचा समक्ष 11000 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानतर आलोसे क्र. यांचे सांगणे वरून आलोसे क्र 2 यांनी राजुरा ग्रामपंचायत येथे सहा हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा पर्यवेक्षक अधिकारी – .सुहास देशमुख,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव
*सापळा व तपास अधिकारी – अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा पथक – सफौ दिनेशसिंग पाटील ,पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रणेश ठाकूर