इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोटर सायकल रॅलीचे आयोजन गुरुवारी ११ वाजता करण्यात आले आहे. डोंगरे वसतिगृह, जुना गंगापूर नाका येथून मोटर सायकल रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अशोक स्तंभ, पंचवटी, डॅा. आंबेडकर पुतळा अशा ठिकाणीहून ही मोटर सायकल रॅली जाणार आहे.
या रोड शोमध्ये महायुतीचे घटक पक्षातील नेते कार्यकर्ते सामील होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या शोबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा महिला आघाडी मेळाव्याचे आयोजन दुपारी १ वाजता ठक्कर डोम, सिटी सेंटर मॉल जवळ येथे करण्यात आले आहे.