नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पहिल्या टप्यातील वैद्यकीय विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेला १८ मे २०२४ पासून प्रारंभ होणार आहे.
राज्यातील एकूण ३९ परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेत एम.बी.बी.एस. (OLD/CBME-2019) पदवी व वैद्यकीय पदव्युत्तर विद्याशाखांचे एकूण अंदाजे ३१८८ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. या परीक्षा ३ जून २०२४ पर्यंत घेण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी उत्तर पत्रिकांचे त्याच दिवशी संबंधीत परीक्षा केंद्रांवर स्कॅनिंग करुन केंद्रीय मुल्यांकन केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने मुल्यमापन केले जाणार आहे. परीक्षेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द केली आहे.