नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड येथील लॅाजमध्ये मुक्कामी थांबलेल्या प्रवासी महिलेचा विनयभंग करण्यात आला. स्वाक्षरी घेण्याच्या बहाण्याने रूममध्ये शिरलेल्या व्यवस्थापकानेच हे कृत्य केले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरफान शहा एअसान शहा फकीर (४४ रा.मुमताज नगर,वडाळागाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित लॉज व्यवस्थापकाचे नाव आहे. पीडिता मंगळवारी (दि.१४) नाशिकरोड येथील रेल्वेस्टेशन भागात असलेल्या नॅशनल लॉज येथे मुक्कामी थांबली असता ही घटना घडली.
सकाळच्या सुमारास महिला आपल्या रूममध्ये विश्रांती घेत असतांना लॉजिंगच्या रजिष्टरवर साक्षरी घेण्याच्या बहाण्याने रूममध्ये शिरलेल्या संशयित व्यवस्थापकाने तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.