इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नकली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होईल. काँग्रेसच्या पावलावर नकली शिवसेनेचे पाऊल टाकत आहे. नकली शिवसेनाचा आवाज बंद झालाय. नकली शिवसेना सावकरांना विरोध करणा-याबरोबर आहे. नकली शिवसेनेला मोठा अहंकार आहे. जनेतचं काहीच पडलं नाही, नकली शिवसेनेने राम मंदिर प्राणप्रतिष्ठाणाचे निमंत्रण नाकारले, नकली शिवसेनेची पार्टनरशिप ही पापाची असे सांगत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, चार टप्यात मतदानात नकली शिवसेना चारीमुंड्या चीत झाली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॅा. भारती पवार यांच्या प्रचारासाठी बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जोपूळ रस्त्यावरील शरदचंद्र पवार मुख्य आवार, कृषि उत्पन्न बाजार समिती मैदानावर झाली. या सभेत मोठया प्रमाणात सभेला गर्दी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, गिरीष महाजन, पालकमंत्री दादा भुसे, यांच्यासह महायुतीमधील पक्षाचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.
यावेळी मोदी म्हणाले की, एनडीए आघाडीला मोठा विजय मिळणार आहे, याची माहिती इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्याच्या विधानातून कळते. त्यांना माहीत आहे की, इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेस प्रचंड प्रमाणात हारणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षही बनू शकणार नाही. त्यामुळेच इथल्या नेत्याने त्यांनी सर्व छोटे छोट्या पक्षांना सल्ला दिलाय की, निवडणुका संपल्यानंतर सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणजे आपले आपले शटर बंद केले पाहिजे. त्यांना वाटतं सर्व दुकान त्या दुकानात गेले तर काँग्रेस विरोधी पक्ष बनेल. ही यांची परिस्थिती आहे असे सांगत त्यांनी शरद पवारांवर निशणा साधला.
यावेळी त्यांनी कांद्याच्या प्रश्नांवरही माहिती दिली. त्याचप्रमाणे या सभेत त्यांनी डॅा. भारती पवार यांच्या कोरोना काळातील कामांचे कौतुक केले. मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने काम करणारे आम्ही आहोत. जनतेची सेवा हेच माझे काम आहे. काँग्रेसने धर्माच्या नावावर राजकारण केले. मी धर्माच्या आधारावर आरक्षण आणि बजेट होऊ देणार नाही. वंचितचा जो अधिकारी त्याला मोदीचा आधार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सभेला झालेल्या गर्दीमुळे शिवसेना व भाजमध्ये जल्लोष होता.
या सभेत कांद्याच्या प्रश्नांवर शेतक-यांनी घोषणाबाजी केली. त्यांना पोलिसांनी सभे बाहेर काढले. कांद्याच्या प्रश्नावर कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.