मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे. या समाजाला शांती आणि सुरक्षा हवी असते. आज देशाचे नाव जगात उंचावेल असा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपली अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आणली. आगामी काळात ती नंबर तीनवर आणण्याचा संकल्प केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जैन समाजाचे धर्मगुरू आचार्य प्रवर श्रीमत नयपद्मसागर सुरीश्वर महाराज साहेबजी यांनी आयोजित केलेल्या ‘भारत कल आज और कल’ या व्याख्यानाला उपस्थित राहून जैन समाज बांधवांशी संवाद साधला. तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ.यामिनी जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन जैन समाजातील बंधू भगिनींना केले. यावेळी आचार्य प्रवर श्रीमत नयपद्मसागर सुरीश्वर महाराज यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राजवाडी जैन समाजाकडून तिलक लावून आणि सापा देऊन केलेल्या सन्मानाचा विनम्रपणे स्वीकार केला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसपासून स्वतःला दूर ठेवले, त्यांच्यासोबतच उबाठा यांनी सरकार स्थापन केले. आता काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलायला लागली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना आपल्यासोबत प्रचाराला घेऊन फिरत आहेत. ‘हिंदू’ शब्द म्ह
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला जैन समाज बांधवांशी संवाद…केले हे आवाहन
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे. या समाजाला शांती आणि सुरक्षा हवी असते. आज देशाचे नाव जगात उंचावेल असा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपली अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आणली. आगामी काळात ती नंबर तीनवर आणण्याचा संकल्प केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जैन समाजाचे धर्मगुरू आचार्य प्रवर श्रीमत नयपद्मसागर सुरीश्वर महाराज साहेबजी यांनी आयोजित केलेल्या ‘भारत कल आज और कल’ या व्याख्यानाला उपस्थित राहून जैन समाज बांधवांशी संवाद साधला. तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ.यामिनी जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन जैन समाजातील बंधू भगिनींना केले. यावेळी आचार्य प्रवर श्रीमत नयपद्मसागर सुरीश्वर महाराज यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राजवाडी जैन समाजाकडून तिलक लावून आणि सापा देऊन केलेल्या सन्मानाचा विनम्रपणे स्वीकार केला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसपासून स्वतःला दूर ठेवले, त्यांच्यासोबतच उबाठा यांनी सरकार स्थापन केले. आता काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलायला लागली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना आपल्यासोबत प्रचाराला घेऊन फिरत आहेत. ‘हिंदू’ शब्द म्हणायला त्यांची जीभ कचरू लागली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधायला विरोध करणाऱ्या फारुख अब्दुल्ला यांना सोबत घेऊन बसत आहेत. त्यामुळे हिंदू धर्मासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करावेत असे आवाहन जैन समाज बांधवांना केले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार मिलिंद देवरा, महायुतीच्या उमेदवार सौ.यामिनी जाधव तसेच जैन समाजातील बांधव भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
णायला त्यांची जीभ कचरू लागली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधायला विरोध करणाऱ्या फारुख अब्दुल्ला यांना सोबत घेऊन बसत आहेत. त्यामुळे हिंदू धर्मासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करावेत असे आवाहन जैन समाज बांधवांना केले.