इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे शरद पवार व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या या सभा आहे. आज पंतप्रधानाची सभा दुपारी १ वाजता पिंपळगाव बसवंत येथे आहे. तर उध्दव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये रात्री ७ वाजता अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे होणार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सभा वणी व निफाड येथे होणार आहे.
एकाच वेळी या नेत्यांच्या तोफा धडाडणार असल्यामुळे आरोपांच्या फैरी येथे झडणार आहे. कोण काय बोलतो व त्याला कसे प्रत्त्युत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी मोदी यांची सभा झाल्यानंतर उध्दव ठाकरे व शरद पवारांची सभा असल्यामुळे मोदींच्या भाषणावर या दोन्ही नेत्यांना टीका करता येणार आहे.
मोदींच्या सभेसाठी जोरदार तयारी
नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॅा. भारती पवार यांच्या प्रचारासाठी बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही जोपूळ रस्त्यावरील शरदचंद्र पवार मुख्य आवार, कृषि उत्पन्न बाजार समिती मैदानावर होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
तर ठाकरे व पवारांची सभाही गाजणार
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये रात्री ७ वाजता अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सभा वणी व निफाड येथे होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने तयारी केली आहे.