इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून केली आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही असेही म्हटले आहे.
वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी एनडीएच्या नेत्यांची यावेळी उपस्थितीत होते. त्यावेळी प्रफुल पटेल यांनी जिरेटोप मोदींच्या डोक्यावर परिधान केला होता. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर नेते उपस्थितीत होते.