इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेनेने केलेल्या कामाच्या बळावर आमचे सर्व १५ उमेदवार निवडून येतील आणि राज्यात देखील आम्ही ४५ हुन अधिक जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी न्यूजच्या ‘माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कसलीही सहानुभूती नसून येत्या ४ जून रोजी कुणाच्या भावना कुणासोबत आहेत ते समजेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमच्यावर आरोप करणाऱ्यांकडे कोणताही अजेंडा नसल्याने ते फेक नरेटिव्ह तयार करून टीका करतात असेही ते म्हणाले.
या विशेष कार्यक्रमात सहभागी होत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोगत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्पष्ट बहुमत घेऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी अविनाश पांडे सीईओ एबीपी नेटवर्क, प्रवीण बाढेकर, संचालक, बढेकर ग्रुप, ज्येष्ठ पत्रकार दिबांग, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, एबीपी न्यूजचे एक्झिक्युटिव्ह वाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर, पत्रकार गणेश ठाकूर, पत्रकार वैभव परब तसेच एबीपी माझा वृत्तवाहिनीतील सर्व पत्रकार उपस्थित होते.