मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवहीची खर्च निरीक्षकांसमोर १३ मे रोजी द्वितीय तपासणी करण्यात आली. २१ उमेदवारांपैकी १९ उमेदवारांनी आपले खर्च सादर केले. दोन उमेदवारांनी तपासणीसाठी खर्च सादर केले नाहीत.
तपासणीसाठी खर्च सादर केलेले नाहीत, असे मनोज श्रावण नायक, कपिल कांतिलाल सोनी यांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच उमेदवार रवींद्र वायकर यांना खर्चातील तफावतीबाबत नोटीस देण्यात आली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.