सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना १४९ ची नोटीस आज बजावली आहे. एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर सोबत पोलिस पथक यावेळी हजर होते.
नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॅा. भारती पवार यांच्या प्रचारासाठी बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ही जोपूळ रस्त्यावरील नवीन कृषि उत्पन्न बाजार समिती मैदानावर होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या सभे निमित्त कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे. त्यामुळे त्यांनी कोठे आंदोलन करु नये यासाठी पोलिसांनी या नोटीस दिल्या असल्याचे बोलले जात आहे.