इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कानपूर – मुस्लिम धर्मामध्ये तलाक पद्धती आहे म्हणजे एखाद्या पती-पत्नीला एखाद्या पतीला पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याने तिनदा तलाक म्हटले की, घटस्फोट मान्य केला जातो. मात्र या वाईट प्रथेविरूध्द गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने होत असून या संदर्भात कायदा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी पुरुष तिनदा तलाक म्हणून घटस्फोट देतात. या अन्यायकारक प्रथेचा गैरवापर उत्तर प्रदेशात नुकताच झाला असून त्या महिलेने या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पती विरुध्द गुन्हा दाखल केला आहे, कारण तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिचा पती संतापला व पत्नीला घरातून हाकलून देत ट्रिपल तलाक देऊन तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे ट्रीपल तलाकची एक भयानक घटना समोर आली आहे. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला घराबाहेर हाकलून दिले. तसेच हुंड्याची मागणी करून पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर पतीने तीन वेळा ‘तलाक तलाक तलाक’ म्हणत महिलेला घराबाहेर काढले. याप्रकरणी महिलेने नाराजी व्यक्त करत पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी सासरच्या आठ लोकांविरुद्ध हुंडाबळी, ट्रिपल तलाक, मारहाण आदी अशा अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
२०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने तिहेरी तलाक म्हणजेच तलाक-ए-बिद्दत असंवैधानिक ठरवलं. न्यायालयाने सरकारला तिहेरी तलाक रोखण्यासाठी कायदा करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने डिसेंबर २०१७ मध्ये मुस्लीम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) विधेयक सादर केले, मात्र हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले, पण राज्यसभेत अडकले होते, त्यानंतर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर सरकारने काही सुधारणांसह हे विधेयक पुन्हा मांडले यावेळी हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले. पण, तलाख काही थांबल्या नाही.