इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून अभिनेत्री कंगणा रनौतने अर्ज दाखल केला. यावेळी भव्य रोड शो ही करण्यात आला. मंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रेम आणि विश्वास पाहून मी भारावून गेलो आहे. मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेत्यांचे आभारी आहे. त्यांनी मला मंडीतील लोकांची सेवा करण्याची संधी दिली. मला पूर्ण विश्वास आहे की देशाला पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी ऐतिहासिक जनादेश मिळेल असे तीन सांगितले.