इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः केंद्र, राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत आमचीच आहे. असे असताना घाटकोपर मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे, असे सवाल करीत मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरे यांची पाठऱाखण केली. भाजपच्या आमदारांनी केलेली टीकेला त्यांनी उत्तर दिले.
भाजप नेते राम कदम यांनी भावेश भिडेचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला. १४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार भावेश भिडे.. उद्धव ठाकरे यांच्या घरात.. अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते? असा सवाल करीत त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. टक्केवारीसाठी १४ लोकांचे नाहक बळी घेता…कुठे फेडणार हे पाप..?”, अशी टीका कदम यांनी केली. त्यानंतर भुजबळ यांची प्रतक्रिया समोर आली आहे.
भुजबळ या घटनेबाबत म्हणाले की, राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत आमचीच सत्ता आहे. असे असताना होर्डिंग प्रकरणाचा ठाकरे यांच्याशी काय संबंध? राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येतात. व्यापारी सर्वांच्याच भेटी घेतात. फोटो काढतात. यामुळे या प्रकरणात ठाकरे यांचा संबंध नाही. त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये.
मुंबईत विमानतळाकडे जाताना अनेक हॉर्डिंग दिसतात. होर्डिंग समांतर असण्याऐवजी रस्त्यावर आले आहेत. त्यांचे वजन खूप आहे. या सर्व अनधिकृत होर्डिंगची चौकशी करण्याची मागणी भुजबळ यांनी केली. बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासाठी वेळ घालवण्याऐवजी सर्व प्रशासकीय संस्थांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.