नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील ग्लोबल व्हिजन स्कूल परिसरात भरदिवसा चोरट्यानी एकाच इमारतीतील दोन घरे फोडून सुमारे ७५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करणयत आला आहे.
विलास हरिभाऊ आरोटे (रा.शिवाजीचौक,लेखानगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोटे यांच्या अंबड येथील ग्लोबल व्हिजन स्कुल परिसरातील शांतीकुंज अपार्टमेट या सोसायटीत ही घटना घडली. आरोटे व शेजारी महेश पाटील यांचे कुटुंबिय सोमवारी (दि.१४) कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यासह पाटील यांच्या बंद घराचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटांमध्ये ठेवलेले सुमारे ७५ हजार ७५० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.