इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर केली होती. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पण, आता ही निवडणूक पुढे ढकण्यात आली आहे. नाशिकप्रमाणेच मुंबई विभागात शिक्षक व पदवीधर, कोकण विभागात पदवीधर मतदार संघाची निवडणूक १० जून रोजी होणार होती.
ही निवडणूक पुढे ढकल्यामागचे कारण निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यात म्हटले की, शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या बंद झाल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, असे निवेदन आयोगाकडे प्राप्त झाले आहे. आयोगाने या संदर्भात उपरोक्त निवेदनाचा विचार करून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
७ जुलै पर्यंत मुदत
नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदार संघातून ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे हे निवडून गेले होते. त्यांची मुदत ७ जुलै पर्यंत आहे. या मतदार संघात ७० हजार शिक्षक मतदार आहे.