नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका शिक्षीकेचा विनयभंग केला आहे. नातेवाईक असलेल्या ५७ वर्षीय व्यावसायकीने हे कृत्य केले. पतीस दम दिल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताकडून गेल्या तीन साडे तीन वर्षापासून महिलेचा पाठलाग सुरू असून, अनेक वेळा महिला शाळेत कामावर जात असतांना तिची वाट अडवित लिफ्ट देण्याच्या बहाण्याने संशयिताने तिला आपल्या वाहनात बसविले होते. यावेळी चेष्टामस्करीत गळयात हात टाकून त्याने सेल्फी काढले होते. यावेळी त्याने विवाहची मागणी घालत महिलेचा विनयभंग केला.
कालांतराने त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेच्या पतीस दमदाटी केल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.