इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत एनडीएचे सर्व प्रमुख नेते उपस्थितीत होते. उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी ते दशाश्र्वमेध घाटावर गेले. त्यानंतर त्यांनी काल भैरवचे दर्शन केले.
उमेदवारी अर्ज भरतांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू, चिराग पासवान हे उपस्थितीत होते.