नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवान्यासाठी ५०० रुपयाची लाच घेतांना विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या शिपाई गीता हेमंत बोकडे या एसीबीच्या जाळ्यात अडकल्या. त्यांच्या विरुध्द भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही एसीबीने सांगितले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार या विद्युत अभियंता असून त्यांना विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळणे करता, विद्युत निरीक्षक कार्यालय उद्योग ऊर्जा कामगार विभाग नाशिक येथे अर्ज करावयाचा असल्याने आलोसे या सदर कार्यालयात कार्यरत असल्या कारणाने फिर्यादी यांच्यावर सदर परवाण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून परवाना मिळून देईल असे सांगून तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून यापूर्वी १५०० रुपये लाचेची मागणी केली. त्यातील १००० रुपये यापूर्वी स्वीकारले असून १३/०५/२०२४ रोजी तक्रारदार यांच्या तक्रारी प्रमाणे पंचांसमक्ष उर्वरित ५०० रुपयांची लाच मागणी करून लाच रक्कम स्वीकारली म्हणून पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेण्यात आले असून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
……
यशस्वी सापळा कारवाई**
युनिट – नाशिक
तक्रारदार- महिला, वय- ३३वर्ष.
आलोसे- सौ. गीता हेमंत बोकडे, शिपाई – विद्युत निरीक्षक कार्यालय, उद्योग ऊर्जा कामगार विभाग,नाशिक. वय ४५,वर्षे, रा. फ्लॅट नंबर २२,गणेश वास्तू अपार्टमेंट,अशोका मार्ग नाशिक.
*लाचेची मागणी- ५०० /-
*लाच स्विकारली- ५००/-
*हस्तगत रक्कम- ५००/-
*लालेची मागणी – दि.१३/०५/२०२४
*लाच स्विकारली – दि.१३/०५/२०२४
तक्रार:- यातील तक्रारदार या विद्युत अभियंता असून त्यांना विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळणे करता, विद्युत निरीक्षक कार्यालय उद्योग ऊर्जा कामगार विभाग नाशिक येथे अर्ज करावयाचा असल्याने आलोसे या सदर कार्यालयात कार्यरत असल्याकारणाने फिर्यादी यांच्यावर सदर परवाण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून परवाना मिळून देईल असे सांगून तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून यापूर्वी १५००/- रुपये लाचेची मागणी केली त्यातील १०००/-रुपये यापूर्वी स्वीकारले असून आज दिनांक १३/०५/२०२४ रोजी तक्रारदार यांच्या तक्रारी प्रमाणे पंचांसमक्ष उर्वरित ५००/- रुपयांची लाच मागणी करून लाच रक्कम स्वीकारली म्हणून पंचां समक्ष त्यांना ताब्यात घेण्यात आले असून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. अधीक्षक अभियंता,
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा व तपास अधिकारी – श्रीमती गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं. 75 88 51 60 42
*सापळा पथक – पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल.