नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात पार्क केलेल्या अॅटोरिक्षासह दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमिरखान मुनीरखान पठाण (रा.लोकराज सोसा.मदिना चौक) यांची अॅटोरिक्षा एमएच १५ इएच १४४६ गुरूवारी (दि.९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.
दुसरी घटना नवीन मेळा बसस्थानक भागात घडली. विलास निवृत्ती कदम (रा.भगवतीनगर,हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. कदम रविवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास नवीन मेळा स्थानक भागात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची युनिकॉर्न एमएच १५ एफआर ३०७१ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.
……..