इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे जेष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांचे निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. गेल्या सहा महिन्यापासून ते कँसरबरोबर झुंज देत होते. मोदी यांनी पटना सांइंस कॅालेजमधून बॅाटनी विषय घेऊन त्यांनी पदवी घेतली होती. १९९० मध्ये बिहारमध्ये आमदार झाले होते. त्यानंतर तीन वेळा ते निवडून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रध्दांजली अर्पण करतांना म्हटले की, पक्षातील माझे बहुमोल सहकारी आणि माझे अनेक दशकांचे मित्र सुशील मोदीजी यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. बिहारमध्ये भाजपच्या उदय आणि यशात त्यांचे अमूल्य योगदान आहे. आणीबाणीला कडाडून विरोध करत त्यांनी विद्यार्थी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. अत्यंत कष्टाळू आणि मनमिळाऊ आमदार म्हणून त्यांची ओळख होती.
राजकारणाशी संबंधित विषयांची त्यांची समज खूप खोल होती. प्रशासक म्हणूनही त्यांनी खूप कौतुकास्पद काम केले. जीएसटी मंजूर करण्यात त्यांची सक्रिय भूमिका कायम स्मरणात राहील. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह माझ्या संवेदना आहेत. ओम शांती!
पंतप्रधानांबरोबरच सुशीलकुमार मोदी यांच्या निधनानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.