नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर पालिका हद्दीत ८०० कोटीचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन तो पर्यंत लाभार्थीनी शांत झोपावे. महाराष्ट्र कोण लुटत आहे? अशी पोस्ट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी केली होती. त्यानंतर आता आज सकाळी ९.३० वाजता यावर राऊत बोलणार आहे.
यावेळी त्यांनी सोमवारी पोस्ट टाकत म्हटले की, विकासासाठी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ ला केली. पुढे काय झाले? लुटा लूट! भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचा. एकनाथ शिंदे व त्यांचे बिल्डर साथीदार या घोटाळ्यातील लाभार्थी आहेत. उद्या सकाळी ९.३० वाजता अधिक बोलू असे म्हटले आहे.
आगोदरच्या पोस्टमध्ये त्यांनी मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण! असल्याचे म्हटले आहे.