इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॅा. भारती पवार यांच्या प्रचारासाठी बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ही जोपूळ रस्त्यावरील नवीन कृषि उत्पन्न बाजार समिती मैदानावर होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही मतदार संघासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळेसही पिंपळगाव हेच ठिकाण निवडण्यात आले आहे. नाशिक लोकसभा मतदार संघासाठी हे ठिकाण जवळ आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात हे ठिकाण आहे. सहा एकरच्या या परिसरात पाऊस व ऊन दोन्हींची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. या सभेला एक लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
या सभेत पंतप्रधान मोदी काय बोललात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मोदी यांनी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. महायुतीच्या प्रमुख उमेदवारांच्या प्रचार्थ त्यांनी राज्यात सभा घेतल्या आणि या सभांना उत्स्फुर्त प्रतिसादही लाभला आहे. त्यांच्या तडाखेबाज भाषणाची झलकही यानिमित्ताने पहायला मिळाली. आता पिंपळगावमध्येही पुन्हा नाशिककरांना याचा अनुभव येणार आहे.
यासभेसाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस , महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय (आ), रासप, पीपल्स रिपबलिकन पक्ष (क), प्रहार संघटना, रयत क्रांती संघटना, आणि मित्रपक्षांचे नेते उपस्थितीत राहणार आहे.