इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपने एकीकडे ४०० पारचा नारा दिलेला असतांना राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. त्यात त्यांनी देशातील राज्यनिहाय विश्लेषन केले आहे. त्यात त्यांनी भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी हा एक्झिट पोल नसून हे वास्तव असल्याचा दावा केला आहे.
सोशल मीडियावर त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात म्हटले आहे की, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे जे तुमच्यापासून दडपले जात आहे.या लोकसभा निवडणुकीने एक वळण घेतले आहे हे सत्य आहे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि शेअर करा!
योगेंद्र यादव हे पूर्वी स्वतंत्र राजकीय विश्लेषक होते. पण, सध्या ते इंडिया आघाडीचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या या विश्लेषणावर भाजपने प्रश्न केला तर त्यात काही वावगे नाही…