इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईतील घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ७० ते ८० चारचाकी गाड्या बॅनरखाली अडकल्या. आता पर्यंत ५९ जणांना बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही जण अडकले आहे. मुंबईत वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे पहिली घटना वडाळा येथील श्री जी टॉवरजवळ होर्डिंग कोसळले. त्यानंतर घाटकोपमध्येदेखील अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग हे पेट्रोल पंपावर कोसळले. यात १०० जण अडकले होते. एनडीआरएफच्या टीमने ५९ जणांना आतापर्यंत वाचवण्यात य़श मिळवले.
घाटकोपरमध्ये पाऊस आणि वादळी वारा आल्यानंतर अनेक जण पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी पेट्रोल पंपाच्या छताखाली गेले होते. तर दुसरीकडे अनेक वाहनं पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपवर आल्या होत्या. या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे पट्रोल पंपाच्या बाजूला लावण्यात आलेले भलंमोठं होर्डिंग हे थेट पेट्रोल पंपावर कोसळले. घाटकोपरमधील रमाबाई परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी तातडीने पाचरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना वाचवण्यात यश आले.
या घटनेबाबत सर्व माहिती व मदतकार्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला…