नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- समग्र शिक्षा जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत, जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अंशतः अनुदानित, पूर्णतः अनुदानित शाळा आदिवासी विकास विभाग संचलित व अनुदानित आश्रम शाळा, समाज कल्याण विभाग संचलित व अनुदानित शाळा अशा एकूण ४२३८ शाळांमधील इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी इयत्तांच्या ४६६३६९ विद्यार्थ्यांकरिता १९३३७७४ इतक्या मोफत पाठ्यपुस्तक प्रतींचे वितरण आज शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॅा. नितीन बच्छाव यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.
असे होणार वितरण :*
दि.१३ मे ते दि. ३१ मे २०२४ पर्यंत पाठ्यपुस्तक भांडार अंबड ते तालुकास्तरावर
दि.१ जून ते दि.१२ जुन २०२४ पर्यंत तालुकास्तर ते शाळा स्तरावर
दि. १५ जून २०२४ प्रत्येक शाळा स्तरावर शाळेच्या पहिल्या दिवशी समारंभ पूर्वक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार
वरीलप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्व निकष पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहचविण्यात येणार असल्याने निकष पात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके विकत घेऊ नयेत असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ. नितीन बच्छाव यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या ३०९७६१ विद्यार्थ्यांसाठी १२३९०४४ इतक्या पाठ्यपुस्तक प्रती तसेच सेमी इंग्रजीच्या १४७३०७ विद्यार्थ्यांसाठी ५८९२२८ इतक्या पाठ्यपुस्तकांच्या प्रती, उर्दू माध्यमाच्या ८११२ विद्यार्थ्यांसाठी ३२४४८ प्रती, हिंदी माध्यमाच्या १६४ विद्यार्थ्यांसाठी ६५६ प्रती, इंग्रजी माध्यमाच्या १०२५ विद्यार्थ्यांसाठी ४१०० इतक्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण समग्र शिक्षा जिल्हा परिषद,नाशिक यांच्या कडुन करण्यात येणार आहे, यावेळी साह्यक कार्यक्रम अधिकारी सुनील दराडे, भांडार व्यवस्थापक संध्या जाधव, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर विषयसाधन व्यक्ती प्रमोद पगारे, पाठ्यपुस्तक वितरण केंद्र येथील विजय दाभाडे, शशिकांत धुमाळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.