अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अकोला जिल्ह्यातील मळसूर गावात कुलरच्या विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नितीन गजानन वानखडे हे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, नितीन वानखडे (वय ३८) हे कामावरून घरी परतले. घरातील कूलर बंद पडला म्हणून त्यांनी कूलर चालू करायचा प्रयत्न केला. कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला. कूलर त्यांच्या अंगावर पडला. त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. ही घटना त्यांचे वडील आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी वीजपुरवठा खंडित केला. ग्रामस्थांच्या मदतीच्या नितीन यांना उपचार्थ हलवण्यात आले; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांचे निधन झाले.
विदर्भात कडक उन्हामुळे घरोघरी कुलरचा वापर केला जातो. पण, गेल्या महिनाभारत कुलरमुळे जीव गमवावा लागल्याची ही तिसरी घटना आहे.