इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चे मडके असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर राऊत यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. ओऽऽऽ टीनटप्पर सर्वज्ञानी असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस काय आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे असे सांगितले.
या पोस्टमध्ये वाघ यांनी म्हटले आहे की, देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिट मटेरियल आहेत; तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे मात्र वकुब नसलेले टमरेल आहात…त्यामुळे ४ जूनला तुम्ही जनतेकडून सणसणीतपणे लाथाडले जाणार आहात. कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठे तुम्हा नकलींचा कमअस्सल खोटा शिक्का…?देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही..
जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे ते निष्णात डॅाक्टर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे सल्ले उद्धवजींसाठी जपून ठेवा…आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीची भाषा वापराल तर त्याचं भाषेत ठोक उत्तर तुम्हाला देऊ हे लक्षात ठेवा असेही वाघ यांनी म्हटले आहे.