इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोलकात्ताःसंदेशखळीबाबत भाजपचे षडयंत्र उघड झाले आहे, याची पंतप्रधानांना लाज वाटली पाहिजे. संदेशखळीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही खोटे बोलत आहेत; परंतु राज्यपालांवरील विनयभंगाच्या आरोपावर मौन बाळगले आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील निवडणूक प्रचारादरम्यान बॅनर्जी यांनी मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संदेशखळी प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच राज्यपाल सीव्ही आनंद बोल यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपांवर मौन पाळल्याबद्दल मोदी यांची कोंडी केली. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर राजभवनच्या एका कर्मचाऱ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपप्रकरणी मोदी यांनी मौन पाळले. यावरून भाजपची महिलांविरोधीची संवेदनशीलता दिसते, अशी टीका त्यांनी केली.
महिलेचा विनयभंग केलेल्या राज्यपालाच्या शेजारी बसण्यासही आपल्याला लाज वाटते, अशी टीका करताना मोदी यांनी मात्र राजभवनावर दिलेल्या भेटीबद्दल नाराजी व्यक्त करून पंतप्रधानांनी राज्यपालांना राजीनामा देण्यास का सांगितले नाही? असा सवाल त्यांनी केला.