नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव तालुक्यात काल रात्री वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने दुष्काळी तालूक्यातील शेतक-यांसाठी झालेला अवकाळी पाऊस वरदान ठरला. रात्रीतून जवळपास अंदाजे ८० मिलीमीटर पाऊस झाल्याने अनेक पाझर तलाव,बं धारे तसेच विहिरींना पाणी उतरले असून यामुळे काही प्रमाणात का होईना जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. तर वादळी वा-यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर वृक्ष उन्मळून पडल्याने या रस्त्याने जाणा-या वाहन धारकांना अडचणीचा सामना करत जावे लागत आहे.