इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धुळे-मालेगाव लोकसभा मतदार संघातून काँग्रेस तर्फे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी आपल्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आज डॉ तुषार शेवाळे यांनी धुळे येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून त्यांच्या भाजपा प्रवेशाने मालेगाव काँग्रेसला खिंडार पडले आहे.
डॅा. शेवाळे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, पक्षाने डॅा. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर काँग्रेसने नाराजी दूर करुन राज्यस्तरावरील पदही दिले. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आज त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.