इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मला तुरुंगात पाठवण्यामागे भाजपचा हेतू ‘आप’ मोडून आमचे सरकार पाडण्याचा होता. या काळात भाजपने अनेक आमदार आणि आपच्या नेत्यांशी संपर्क साधला, पण आमचे कार्यकर्ते डगमगले नाहीत. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिल्लीतील सर्व आमदारांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मला अटक करून भाजपला पक्ष फोडायचा होता आणि सरकार पाडायचे होते पण झाले उलटे. जनतेला औषधे मिळणे बंद होणार नाही ना, अशी भीती वाटत होती. मोफत वीज आणि पाणी कुठेतरी थांबले नाही, पण सर्वांनी खूप चांगले काम केले आणि कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ दिले नाही.