मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावी रात्रभर वादळ वाऱ्यासह तुफान पाऊस पडला… त्यातच रात्रभरापसून विजेचा पुरवठा ही खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले झाले होते… परिसरात काही ठिकाणी वीज पडल्याच्या देखील घटना घडल्या आहेत..मात्र राज्यात उष्णतेचे उच्च तापमान असणाऱ्या मालेगावाच्या वातावरणात पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला आहे.तर रात्रीच्या पावसाने कॉलेज ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले.
मालेगावप्रमाणेच नाशिक व जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्ये शनिवारी रात्री व रविवारी सकाळी पाऊस पडला. तर जिल्हयातही अनेक ठिकाणी पाऊस झाला.