नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांत मंत्री भुजबळांची मित्रपक्षांचे नेते भेट घेत आहे. त्यात ही भेट आज झाली आहे.