नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत यांनी जुन्या नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत पावासाने अचानक हजेरी लावली. त्यानंतर भरपावसात राऊतांची ही सभा पार पडली. सभेला उपस्थितीत असलेल्यांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्याचे चित्र आज नाशिकमध्ये दिसले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची पावसाची सभा गाजली होती. पण, या लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत उध्दव ठाकरे, अजित पवार यांच्या पावसात सभा झाल्या. त्यानंतर आता संजय राऊतांच्याही सभेत पावसाने हजेरी लावली. काल तर पावसामुळे अनेक राजकीय सभा रद्द झाल्या. पण, आज सभा झाल्या, त्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी होती.
जुन्या नाशिकमध्ये झालेल्या या सभेत खा. संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. या सभेला माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, सचिन मराठे, काँग्रसचे ज्ञानेश्वर वाघ, माजी नगरसेवक मुशीर सय्यद, संजय चव्हाण, सुचेता बच्छाव, सुरेश मारु, सचिन बांडे, जयंत दिंडे यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.