इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची जाहीर सभा नंदुरबार येथे पार पडली. सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात जनतेसाठी काय केले ते सांगावे, आज शेतकरी संकटात आहे, शेती करणे अवघड झाले आहे. आदिवासी, गरिब जनता त्रस्त आहे. मोदींनी परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख देतो म्हणाले, दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले. पण त्यांनी हे एकही काम केले नाही. मोदींचे राजकारण फक्त सत्तेसाठी आहे, जनतेच्या सेवेसाठी नाही अशी टीका करत लोकसभेच्या निवडणुकीत विचार करून मतदान करा असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. यावेळी समवेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, ॲड. गोवाल पाडवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान, आ. श्री. के. सी. पाडवी, आ. शिरीष नाईक, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संगठन नाना गावंडे, आणि लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.