नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून शुक्रवारी (दि.१०) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यातील युवकाने गळफास लावून घेत तर तरूणीने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत देवळाली कॅम्प व म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार करण नाना कटारे (रा.विजयनगर देवळालीकॅम्प ) या युवकाने शुक्रारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच आई संगिता कटारे यांनी त्यास तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.
दुसरी घटना दिंडोरीरोडवरील हरिहरनगर भागात घडली. पुजा कानोजी मानवतकर (रा.विश्वचंद्र अपा. हरिहरनगर) या युवतीने गेल्या बुधवारी (दि.८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी तिला सेवा हॉस्पिटल मार्फत जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.