नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चालकाने आपल्या ताब्यातील मालट्रक परस्पर स्क्रॅपमध्ये विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश सारंगधर घुले (रा.सावतानगर सिडको) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. याबाबत रजनीश मदनलाल पारीक (रा.अनुसयानगर टाकळीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. पारीक यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून संशयित त्यांच्या मालकिच्या मालट्रकवरील चालक आहे.
गेल्या महिन्यात संशयिताच्या ताब्यातील एमएच १५ डीके ७६४४ हा मालट्रक जनार्दन स्वामी मठासमोरील इसार पेट्रोल पंप परिसरात पार्क केलेला होता. संशयिताने मालकाची परवानगी न घेता मालट्रकची जालना जिह्यात स्क्रॅपमध्ये परस्पर विक्री केली. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.