नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर तर्फे आयोजित निमा, आयमा, जितो, लघुउद्योग भारती नाईस, नाईस सीमा, नाशिक धान्य गाव किराणा व्यापारी संघटना नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटना, नाशिक रेडिमेड क्लॉथ मर्चंट असोसिएशन, क्रेडाई, नाशिक रेडीमेड अँड होजिअरी क्लॉथ मर्चंट असोसिएशन व उद्योजक, व्यापारी संघटनांच्या सहकार्याने नाशिक विभागाच्या सर्वांगिण विकासासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत महत्वाचे विशेष संवाद कार्यक्रमाचे सोमवार १३ मे रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल एक्सप्रेस इन पाथर्डी फाटा, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.
भविष्यातील नाशिकच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातून व येणाऱ्या कुंभमेळा च्या दृष्टीने विकासाचे द्वारे खुली करण्यासाठी विशेष संवाद कार्यक्रम महत्त्वाचा आहे. व्यापारी उद्योजकांनी या विशेष संवाद कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या ज्याही अपेक्षा आहेत त्या मांडू शकतात
तरी या विशेष संवाद कार्यक्रमात नाशिक मधील सर्व व्यापारी उद्योजक, कृषी उद्योजक या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, शाखा चेअरमन संजय सोनवणे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, जितोचे अध्यक्ष सुबोध शाह, क्रेडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तपाडिया, नाशिक धान्य घाऊक किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल संचेती, नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ अमृतकर, नाशिक रेडिमेट क्लोथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, नाशिक रेडिमेड होलसेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बालकिसन धूत, स्टाइस चे अध्यक्ष नामकर्ण आवारे, सीमाचे अध्यक्ष किशोर राठी, आदींसह नाशिकमधील सर्व व्यापारी औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारणी समिती सदस्यांनी केले आहे.