नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १० हजार रुपयाच्या लाच प्रकरणात सातुपर येथील श्यामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक सुभाषचंद्र कौशल प्रसाद मिश्रा व उपशिक्षक दिनेशकुमार जमुना प्रसाद पांडे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
दोन हिंदी भाषिक मुलांच्या प्रवेशाबाबत प्रत्येकी आठ हजार प्रमाणे १६००० रुपये लाच त्यांनी मागितले, त्यापैकी पहिला हप्ता दहा हजार रुपये स्विकारतांना ते जाळ्यात अडकले.
या कारवाईबात एसीबी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची दोन मुले महानगर पालिका शाळा सातपूर नाशिक येथे मराठी माध्यमात इयत्ता ७ वी मध्ये शिकत आहेत. परंतु तक्रारदार हे मूळचे बिहार येथील राहणारे असुन हिंदी भाषिक आहेत तेंव्हा त्यांच्या मुलांसाठी मराठी माध्यमात शिकण्यास अडचण येत असल्याने त्यांना शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय ,श्रमिकनगर ,सातपूर , नाशिक या शासन अनुदानित शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी २९ एप्रिल रोजी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना भेटुन प्रवेश देण्याबाबत विनंती केली असता मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी ८ हजार अशी सोळा हजार रुपयांची इमारत निधीच्या नावाखाली लाचेची मागणी केली होती . त्याची कोणतीही पावती मिळणार नसल्याचे सांगितले होते. आज ११ मे रोजी तक्रारदार पुन्हा त्यांचे मुलांचे शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांना शाळेत भेटले असता त्यांनी पंचा समक्ष १६ हजार लाचेची इमारत निधीच्या नावाखाली मागणी करून त्याची कोणत्याही प्रकारची रिसीट /पावती देण्यास नकार देऊन १६ हजार पैकी १० हजार रुपये पहिला हप्ता म्हणुन पंचा समक्ष यातील उप शिक्षक दिनेशकुमार पांडे यांनी स्वीकारला.
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष
*आलोसे- 1) सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा वय 56 , वर्ष मुख्याध्यापक श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर, सातपूर, नाशिक
2) दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे वय 57 वर्ष उप शिक्षक श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर ,नाशिक
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- रुपये 16000/ दिनांक 11/ 5 / 2024
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक– रुपये 10000/- दिनांक- 11/ 5 /2024
लाचेचे कारण -यातील तक्रारदार यांची दोन मुले महानगर पालिका शाळा सातपूर नाशिक येथे मराठी माध्यमात इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहेत .परंतु तक्रारदार हे मूळचे बिहार येथील राहणारे असुन हिंदी भाषिक आहेत तेंव्हा त्यांच्या मुलांसाठी मराठी माध्यमात शिकण्यास अडचण येत असल्याने त्यांना शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय ,श्रमिकनगर ,सातपूर , नाशिक या शासन अनुदानित शाळे मध्ये प्रवेश घ्यायचा होता
त्यासाठी त्यांनी 29/04/2024 रोजी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना भेटुन प्रवेश देण्याबाबत विनंती केली असता मुख्याध्यापक
मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी 8 हजार अशी सोळा हजार रुपयांची इमारत निधीच्या नावाखाली लाचेची मागणी केली होती . व त्याची कोणतीही पावती मिळणार नसल्याचे सांगितले होते .आज दि .11/05/ 2024 रोजी तक्रारदार पुन्हा त्यांचे मुलांचे शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना शाळेत भेटले असता त्यांनी पंचा समक्ष रु .16000 लाचेची इमारत निधीच्या नावाखाली मागणी करून त्याची कोणत्याही प्रकारची रिसीट /पावती देण्यास नकार देऊन रु .16000/- पैकी रु .10000/- पहिला हप्ता म्हणुन पंचा समक्ष यातील आलोसे उप शिक्षक दिनेशकुमार पांडे यांनी स्वीकारला
▶️ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी –
अध्यक्ष श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिकनगर ,नाशिक
▶️ सापळा अधिकारी
विश्वजीत पांडुरंग जाधव पोलीस उप अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 9823388829
▶️ सापळा पथक–
पो. ह .प्रणय इंगळे
पो .ह .सुनिल पवार
सापळा कारवाई मदत —
पो. ह .सचिन गोसावी
पो. ना .दिपक पवार
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .